ब्युरो टीम : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खरंतर त्यांनी 4 डिसेंबरलाच राजीनामा दिला होता. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित प्रकरण उजेडात आणल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. गेल्या आठ दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर या प्रकरणावर सर्वत्र चर्चांना उधाण आल्यानंतर राज्य सरकारने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सरकारने आयोगाच्या सदस्यपदी ओम प्रकाश जाधव मारुती शिंगारे , मच्छिंद्रनाथ तांबे यांची नेमणूक केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा