ब्युरो टीम :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये युवासेनेच्या सर्व उपहारगृहे, आणि फुटमॉलमधील गाळाधारकाना मराठी पाट्या लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. येत्या तीन दिवसांत सर्व पाट्या बदलल्या गेल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
पुणे शहरांचे शहरध्यक्ष राम थरकुडे यांच्या उपस्थितीत सर्व गाळाधारकाना पाट्या बदलण्याच्या सुचनां देण्यात आल्या. यावेळी वाडगावचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल गोरडे, युवक काँग्रेसच्या वतीने आदिनाथ जाविर , अविनाश कांबळे, व मयुर जावळे, अक्षय कारंडे इ. विद्यार्थी उपस्थित होते.
कोर्टाचा आदेश आहे की सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या पाट्या या मराठीमध्ये लावल्या पाहिजे. आज विद्यापीठामधील सर्व गाळा चालकांना युवासेनाच्या वतीने पाट्या बदलण्याच्या सुचनां देण्यात आल्या आहेत. तसेच भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीकडे देखील याची तक्रार करण्यात आली आहे.
- राम थरकुडे ( युवासेन शहरध्यक्ष, पुणे शहर )
टिप्पणी पोस्ट करा