Parliament Attack: संसदेत फोडलेले रंगीत फटाके महाराष्ट्रातून खरेदी; अमोल शिंदे याच्यावर होती जबाबदारी

 

ब्युरो टीम : बुधवारी, 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत घुसखोरी झाली. चार तरुणांनी संसद परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी कोणाला इजा पोहचवली नाही. पण लक्ष वेधण्यासाठी त्यांनी कलर फटाके आणि घोषणांचा वापर केला. लोकसभा सभागृहात आणि संसद परिसरात पिवळ्या रंग पसरला. या प्रकरणात लातूरमधील चाकूर तालुक्यातील झरी गावातील आहे. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवल्यानंतर या सर्व कटाचा पर्दाफाश झाला. अमोल शिंदे यानेच हे रंगीत फटाके आणल्याचे समोर आले. घुसखोरीचा हा कट अनेक दिवसांपासून शिजत असल्याचे समोर आले आहे.

दीड वर्षांपूर्वी झाली बैठक

संसदेत घुसखोरी करुन गोंधळ माजविण्याचा प्रयत्न देशातील विविध भागातील तरुणांनी दीड वर्षांपूर्वीच आखला होता. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. भगतस‍िंग फॅन क्‍लब त्यांनी तयार केला. दीड वर्षांपूर्वी काय करायचे यासंबंधी म्हैसूरमध्ये त्यांनी एक बैठक घेतली. नऊ महिन्यांनी पुन्हा बैठक घेतली. त्यात संसदेत घुसखोरी करुन अराजकता पसरवण्याचा कट रचला.

अगोदर केली रेकी

या कटात सागर शर्मा, मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम, ललित झा यांच्यासह काही तरुणांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तपास सुरु आहे. त्यानुसार, मार्च महिन्यात या सर्वांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी संसद परिसराची रेकी केली. मनोरंजन याने पास काढून ही कामगिरी केली होती. आरोपी हे 12 डिसेंबर रोजी रात्री गुरुग्राममध्ये विशाल शर्मा याच्या घरी थांबले. याप्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा असल्याचे तपासात समोर येत आहे. हा प्रकार सुरु असताना संसदेच्या बाहेर अमोल शिंदे आणि नीलमचा व्हिडिओ तयार करण्याचे काम ललितवर होते. त्यानं व्हिडिओ तयार करुन तो लागलीच इन्स्टाग्रामवर अपलोड केला. सर्वच आरोपींचे मोबाईल त्याच्याकडे आहेत.

रंगीत फटाके महाराष्ट्रातून

याप्रकरणात लोकसभा सभागृहात आणि संसद परिसरात स्मोक क्रॅकर्सचा वापर करण्यात आला. त्यामुळे पिवळा धूर झाला. हे कलर फटाके अमोल शिंदे याने महाराष्ट्रातून आणल्याचे तपासात समोर आले आहे. मनोरंजन याला माहीत होतं की बूटांची तपासणी केली जात नाही म्हणून त्यांन फटाके बूटांमधून नेले. राजधानी दिल्लीतल्या इंडिया गेट परिसरात फटाके वाटले गेले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने