Police : नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, जिल्ह्यातील 'या' तालुक्यात केला गावठी दारू साठा जप्त

 

विक्रम बनकर (नगर ) : नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारी तलावाच्या कडेला, मौजे धालवडी गावाचे शिवारात, ता. कर्जत, जि. अहमदनगर या ठिकाणी गावठी हातभट्टी दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून तयार गावठी दारूची वाहतूक एका मारुती सुझुकी कंपनीच्या झेन इस्टीलो या वाहनातून होणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळालेवरून विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे श्री. विजय चिंचाळकर सो., मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर श्री. प्रमोद सोनोने सो., मा. परिविक्षाधीन उपअधीक्षक, श्री. प्रवीणकुमार तेली सो., यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक १, अहमदनगर या पथकाने कार्यालयातील स्टाफसह दिनांक २०/१२/२०२३ रोजी पहाटेच्या सुमारास सापळा रचून वरील नमूद ठिकाणी दोन सक्षम पंचासह जाऊन दारूबंदी गुन्ह्याकामी छापा मारला असता सदर ठिकाणी एका मारुती सुझुकी झेन इस्टीलो वाहनामध्ये तयार गावठी दारू भरून शेजारी हातभट्टी गावठी दारू निर्मिती चालू असल्याचे निदर्शनास आले. सदर कारवाई दरम्यान गावठी दारू तयार करण्याचे एकूण ४१०० लिटर कच्चे रसायन, तयार गावठी दारू ९३५ लिटर, काळा गुळ अंदाजे ३५० किलो यासह गावठी दारू वाहतूक करणारी चारचाकी वाहन अशा वर्णनाचा एकूण ४,०२,०५०/- (चार लक्ष दोन हजार पन्नास रुपये मात्र) किमतीचा मुद्देमाल जप्त करून नाशवंत मुद्देमाल नाश करण्यात आला. सदर ठिकाणी आरोपी नामे रमेश गंडीशा काळे, वय-२१ वर्ष, रा. घालवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ खाली या कार्यालयाकडे गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकारच्या कारवाया यापुढेही अशाच सुरु राहतील.

सदर कारवाई मध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक १, अहमदनगर श्री. अण्णासाहेब बनकर, दुय्यम निरीक्षक सर्वश्री कैलास वाळुंजकर, निलेश पालवे, स.दु. नि. श्री. विनोद रानमळकर, जवान सर्वश्री देवदत्त कदरे, अविनाश कांबळे, शुभांगी आठरे यांनी सहभाग घेतला असून गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक, श्री. अण्णासाहेब बनकर हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने