Pune Bhidewada : राष्ट्रीय स्मारकासाठी भिडेवाडा इतिहासजमा! महापालिकेकडून रात्री करण्यात आली कारवाई

 


ब्युरो टीम : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केलेला भिडे वाडा अखेर पुणे महापालिकेने ताब्यात घेतला आहे.  हा वाडा महापालिकेने रात्री पोलीस बंदोबस्तात पाडला. आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भिडेवाडा हा शहराच्या मध्यवस्तीत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने रात्री अकरानंतर वाडा पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रात्री पोलीस बंदोबस्तात वाडा पाडल्याने अखेर भिडेवाडा इतिहासजमा झाला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही न झाल्याने महापालिका प्रशासनाने येथील व्यावसायिकांना सोमवारी सकाळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर दुपारी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या दालनात पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची बैठक झाली. त्यामध्ये वाडा ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास बांधकामे पाडण्यास प्रारंभ झाला. 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलिस उपायुक्त गिल, पालिकेचे उपायुक्त माधव जगताप, प्रतिभा पाटील यांच्यासह शंभरहून अधिक पोलिस कर्मचारी व महापालिकेचे पन्नासहून अधिक कर्मचारी भिडेवाडा ताब्यात घेण्याच्या कारवाईत सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने