ब्युरो टीम : अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आता एका सर्वसामान्य व्यक्तीलाही निमंत्रण दिले आहे. अयोध्या राम मंदिरासाठी देणगी देणारे ते पहिले देणगीदार आहेत. त्यांनी राम मंदिरासाठी स्वत:ची शेती विकली होती. त्यानंतर पुरेसे पैसे न जमल्यामुळे नातेवाईकांकडून १५ लाख रुपये उसनवार घेतले आणि राम मंदिरासाठी एक कोटीची देगणी दिली. अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी देणारे ते पहिली देणगीदार आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये राहणारे सियाराम गुप्ता या रामभक्ताला राम मंदिर ट्रस्टकडून निमंत्रण दिले गेले आहे. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण परिवार आनंदीत झाला आहे.
सियाराम गुप्ता यांनी शेत विकले
सियाराम गुप्ता यांनी श्रीराम मंदिरासंदर्भात न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी देणगी दिली होती. २०१८ मध्ये त्यांनी एक कोटी रुपये दिले होते. त्यासाठी त्यांनी आपली १६ बिघे जमीन विकली. त्यातून ८५ लाख रुपये मिळाले. त्यानंतर एक कोटी रुपये जमले नाही. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून उसनवार पैसे घेतले आणि एक कोटीची देगणी दिली. या देणगीचा कुठेही प्रचार केला नाही.
कोण आहेत सियाराम गुप्ता
सियाराम गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ऑक्टोंबर २०१८ मध्ये एक कोटी रुपयांचा धनादेश राष्ट्रीय स्वयसंवेक संघाच्या काशी प्रांताकडे दिला होता. नोंदीनुसार ते राम मंदिरासाठी देगणी देणारे पहिले देणगीदार आहेत. त्यांना आता २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण दिले आहे. यासंदर्भात त्यांना फोन आला आहे. सियाराम गुप्ता यांनी प्रतापगडमध्येही एक मंदिर बनवले आहे. या मंदिरात ते नियमित पूजा अर्चना करतात. राम मंदिरासाठी निमंत्रण मिळाल्यावर त्यांचा संपूर्ण परिवार आनंदीत झाला आहे. त्यांची मुलगी म्हणाली, राम मंदिरासाठी आम्ही खारीचा वाटा उचलू शकलो, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्टी आहे.
टिप्पणी पोस्ट करा