ब्युरो टीम : अभिनेता रणबीर कपूर याला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर रणबीर आणि कपूर कुटुंबाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कपूर कुटुंब ख्रिसमस साजरा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये जहान कपूर दारु ओततो. त्यानंतर रणबीर लायटरने केकला आग लावतो आणि ‘जय माता दी…’ म्हणतो.. पार्टी कर असताना ‘जय माता दी…’ असं म्हणाल्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘काय मुर्खपणा आहे… ‘जय माता दी…’ ते सुद्धा केकवर दारु टाकल्यानंतर…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘असं करतात तरी देखील आपण यांना आदर्श मानतो…’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘यांना पकडून मारायला हवं…’ सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबाची चर्चा आहे.
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर तुफान चर्चेत आहे. रणबीर आणि आलिया भट्ट यांनी ख्रिसनसच्या मुहूर्तावर लेक राहा हिचा चेहरा चाहत्यांना दाखला. पहिल्यांदा रणबीर आणि आलिया यांनी पापाराझींसमोर राहा हिला आणल्यामुळे तुफान चर्चा रंगली.
सोशल मीडिया राहा कपूर हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. राहा हुबेहूब आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत आहे… असं अनेक चाहते म्हणाले. राहा हिचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. राहा 1 वर्षाची झाल्यानंतर रणबीर आणि आलिया यांनी लेक राहा हिचा चेहरा जगाला दाखवला.
रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा
रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. फक्त भारतात नाही तर, जगभरात ‘ॲनिमल’ सिनेमाने मोठी कमाई केली. सिनेमातील रणबीर कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीनची तुफान चर्चा रंगली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमामुळे तृप्ती डिमरी हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.
टिप्पणी पोस्ट करा