Rohit Sharma : वनडेचे कर्णधारपद सोडताच रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून घेतले; कारकीर्द धोक्यात

 

 

ब्युरो टीम: रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाला एकही आयसीसी जेतेपद जिंकता आलं नाही. वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या सर्व स्पर्धांमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. असं असलं तरी त्याची वैयक्तिक कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पण त्याला नशिबाची हवी तशी साथ मिळाली नाही. मुंबई इंडियन्सने शुक्रवारी आयपीएल 2024 साठी नव्या कर्णधारपदाची घोषणा केली. गुजरात टायटन्समधून परत घेतलेल्या हार्दिक पांड्याकडे ही धुरा दिली आहे. त्यामुळे 17व्या पर्वात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स खेळणार आहे. फ्रेंचाईसीच्या या निर्णयाने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच जेतेपद जिंकली आहेत. त्याला अशा पद्धतीने दूर सारणं क्रीडाप्रेमींना भावलं नाही. पण आयपीएलमधील या बातमीचा त्याच्या क्रिकेट कारकिर्दिवर मोठा फरक पडणार आहे. चला जाणून घेऊयात काय ते…

रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबई इंडियन्स कर्णधारपद स्वीकारलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्स चढता आलेख चाहत्यांनी पाहिला. एक दोन नव्हे पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं. आता मुंबई इंडियन्सने रोहित ऐवजी हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला आहे. मागच्या पर्वात हार्दिक पांड्याकडे गुजरात टायटन्सचं जेतेपद होतं. आता या निर्णयामुळे रोहित शर्माच्या टी20 वर्ल्डकप खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेसाठी रोहित कर्णधार असावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा होती. पण आता हार्दिक पांड्याकडेच धुरा देण्याची शक्यता वाढली आहे. कारण गेल्या वर्षभरापासून टी20 चं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडेच आहे.

रोहित शर्माने या वर्षभरात एकही टी20 सामना खेळलेला नाही. त्याच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड यांनी धुरा सांभाळली आहे. त्यात टीम इंडिया वर्ल्डकप पूर्वी मोजकेच सामने खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवणं खूपच कठीण आहे. त्यामुळे भविष्यात रोहित शर्मा फक्त कसोटी सामन्यात दिसला तर आश्चर्य वाटायला नको. रोहित शर्माचं वय पाहता आता त्याच्या क्रिकेट कारकिर्दिला फुलस्टॉप लागला आहे, असं काही क्रीडातज्ज्ञांचं म्हणणं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने