Sane Guruji : राहुल ससाणे व तुकाराम शिंदे यांचा सन्मान ; राष्ट्र सेवा दल व छात्रभारतीने घेतली सामाजिक कार्याची दखल

 

ब्युरो टीम : साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती दिनी आयोजित संविधान निर्धार सभा वंचितांचे नेते मा. बाळासाहेब आंबेडकर, कष्टकऱ्यांचे नेते मा. बाबा आढाव इ. मान्यवरांच्या उपस्थितीत चेतना कॉलेज, बांद्रा (पूर्व) मुंबई येथे संपन्न झाली. याप्रसंगी राष्ट्र सेवा दलाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात धडपडणाऱ्या व काम करणाऱ्या तरूणांचा सन्मान करण्यात आला. 

गेल्या काही वर्षांत आम्ही विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून विद्यापीठ व विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थीच्या विविध प्रश्नांवर करत असलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन राष्ट्र सेवा दलाने राहुल ससाणे व तुकाराम शिंदे या तरुणांचा मा. बाबा आढाव यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. 

यावेळी बोलताना गुर्जींच्या नावाने पुरस्कार मिळणे ही गोष्ट आमच्यासाठी खरोखरच ऊर्जा व ताकद देणारी आहे. येणाऱ्या काळात आम्ही अधिक चांगले काम करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्नशील राहू  असे म्हटले आहे तसेच पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल राष्ट्र सेवा दल व छात्रभारती च्या संपूर्ण टिमचे राहुल ससाणे व तुकाराम शिंदे यांनी मनापासून आभार मानले आहेत. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने