ब्युरो टीम : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याच्या प्रकृती सध्या खालावली आहे. 14 डिसेंबर रोजी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आणि चाहत्यांना देखील मोठा झटका बसला. 47 वर्षीय अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अभिनेत्याची एंजियोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाची शुटिंग संपल्यानंतर मुंबईत दाखल झाल्यानंतर श्रेयस याला हृदयविकाराचा झटका आला.
आता अभिनेता श्रेयस तळपदे याच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती अभिनेता बॉबी देओल याने दिली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर श्रेयस याच्या हृदयाची धडधड थांबली होती. नुकताच दिलेल्या एक मुलाखतीत बॉबी म्हणाला, ‘माझं आताच श्रेयस याच्या पत्नीसोबत बोलणं झालं आहे. त्या प्रचंड चिंतेत होत्या… हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 10 मिनिटं त्याच्या हृदयाची धडधड थांबली होती. श्रेयस याची एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. श्रेयस याची प्रकृती लवकर स्थिर व्हावी… हीच प्रार्थना सध्या सर्वांनी करायला हवी…’ असं देखील बॉबी देओल म्हणाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी श्रेयस याची एंजियोप्लास्टी करण्यात आली. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘श्रेयस याल गुरुवारी रात्री 8 वाजता रुग्णायलात दाखल करण्यात आलं होतं. त्यावर एंजियोप्लास्टी सुखरुप रित्या पार पडली आहे. त्याला पुढच्या चार ते पाच दिवसांत रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल..’ असं माहिती समोर येत आहे.
श्रेयस याच्या प्रकृतीवर पत्नीचं मोठं वक्तव्य
शुक्रवारी श्रेयस याची पत्नी दिप्ती तळपदे हिने पतीच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. ‘माझ्या पतीची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही चिंता आणि काळजी व्यक्त केली… त्यासाठी आभार. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि लवकरच रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रेयस याच्या प्रकृतीची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
सध्या सर्वत्र श्रेयस याची प्रकृतीची चर्चा रंगली आहे. श्रेयस याने आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रेयस याने फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. सोशल मीडियावर देखील श्रेयस याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
टिप्पणी पोस्ट करा