The Railway Men : द रेल्वे मेन चा देशभर जगभर बोलबाला; सध्या सर्वत्र ट्रेंडीगवर

 

ब्युरो टीम :'द रेल्वे मेन' या सीरिजचा सध्या जगभरात चांगलाच बोलबाला आहे. जगभरातील सिनेरसिकांच्या ही सीरिज पसंतीस उतरली आहे. भोपाळ दुर्घटनेवर बेतलेल्या 'द रेल्वे मेन' या अस्वस्थ करणाऱ्या सीरिजची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 

'द रेल्वे मेन' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. फक्त भारतीयच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांच्यादेखील ही सीरिज पसंतीस उतरली आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही सीरिज आहे. या सीरिजमधील सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावली आहे. वर्षाच्या शेवटी रिलीज झालेली ही सीरिज सध्या ओटीटीवर ट्रेडिंगमध्ये आहे.

'द रेल्वे मेन'चं कथानक काय आहे? 

'द रेल्वे मेन' ही सत्य घटनेवर आधारित सीरिज आहे. भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या 1984 मध्ये कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती. यामध्ये 15 हजारांपेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच घटनेवर आधारित ही सीरिज आहे. 18 नोव्हेंबर 2023 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.

'द रेल्वे मेन'चा जगभरात डंका!

'द रेल्वे मेन' या सीरिजचं जगभरात कौतुक होत आहे. 18 नोव्हेंबरला रिलीज झालेली ही सीरिज आजही नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर आहे. फक्त भारतातच नव्हे तर 36 देशांमध्ये ही सीरिज ट्रेडिंगमध्ये आहे. नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटअंतर्गत निर्मिती करण्यात आलेली ही पहिली सीरिज आहे. आशा आणि मानवतेची एक रोमांचक गोष्ट प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळेल.

शिव रवैल यांनी 'द रेल्वे मेन' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सीरिजच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणाले,"द रेल्वे मेन'च्या निर्मितीचा प्रवास खूपच भावनिक होता. सत्य लोकांसमोर आणण्याच्या हेतुने या सीरिजची निर्मिती केली. या सीरिजचं दिग्दर्शन मला करण्याची संधी मिळाली याचा नक्कीच आनंद आहे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ही सीरिज जगभरातील विविध दर्जाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. जगाच्या चारही कोपऱ्यातून या सीरिजला प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. 36 देशांमध्ये सीरिज ट्रेंड होणं ही सुखद बाब आहे". 

'द रेल्वे मेन' या सीरिजमध्ये आर माधवन, केके मेनन, दिव्येंदु आणि बाबिल खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आयुष गुप्ता यांनी या सीरिजची कथा लिहिली आहे. भोपाळमध्ये घडलेल्या भयानक घटनेच्या जखमा आज 39 वर्षांनंतरही अजून भरलेल्या नाहीत. या घटनेत हजारोंचा जीव गेला होता. तर जे वाचले त्यापैकी काही अपंग आणि काही अंध झाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने