U 19 Cricket : भारताचा नेपाळवर शानदार विजय; नेपाळला 53 धावांत रोखले

 

ब्युरो टीम : अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवत शानदार सुरुवात केली. मात्र रविवारी 10 डिसेंबर रोजी टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियासाठी नेपाळ विरुद्धचा सामना हा स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या हिशोबाने करो या मरो असा होता. मात्र या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. टीम इंडियाने नेपाळचा धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये पाकिस्तानला दे धक्का दिला. राज लिबांनी हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

सामन्याबाबत थोडक्यात पण सविस्तर

टीम इंडियाने टॉक जिंकला. कॅप्टन उदय सहारन याने नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दीपक बोहरा आणि अर्जुन कुमल या सलामी जोडीने 9 धावा जोडल्या. राज लिंबानी याने दीपकला 1 धावेवर आऊट करत नेपाळला झटके द्यायला सुरुवात केली. राज इथून नेपाळला ऑलआऊट करुनच शांत राहिला. राजच्या धारदार बॉलिंगसमोर नेपाळच्या एकाही फलंदाजाला मैदानात उभं राहता आलं नाही.

नेपाळकडून दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर एकालाही दुहेरी धावसंख्या करण्यात यश आलं नाही. नेपाळकडून हेमंत धामी याने सर्वाधिक 8 धावा केल्या. तर अर्जुन कुमल आणि दीपक बोहरा या दोघांनी प्रत्येकी 7-7 धावांचं योगदान दिलं. राजच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा डाव 22.1 ओव्हरमध्ये 52 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 53 धावांचं माफक आव्हान मिळालं.

टीम इंडियाने हे 53 धावांचं आव्हान एकही विकेट न गमावता अवघ्या 43 बॉलमध्ये म्हणजे 7.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 57 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शीन कुलकर्णी याने 30 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 चौकारासह नाबाद 43 धावा केल्या. तर आदर्शने 13 बॉलमध्ये नाबाद 13 धावा करत अर्शिनला चांगली साथ दिली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कॅप्टन), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, आराध्या शुक्ला आणि राज लिंबानी.

नेपाळ प्लेईंग ईलेव्हन | देव खनाल (कर्णधार), अर्जुन कुमल, दिपक प्रसाद डुमरे, हेमंत धामी, उत्तम रंगू थापा मगर (विकेटकीपर), दीपेश कंडेल, आकाश चंद, सुभाष भंडारी, दीपक बोहरा, गुलसन झा आणि दीपक बोहरा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने