ब्युरो टीम : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज जाहीर होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साडे चार वाजता निकालाचं वाचन करतील. २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. शिंदे भाजपसोबत गेले आणि राज्यात सत्तापालट झाला. यानंतर वर्षभरानं अजित पवारांनी बंड केलं. समर्थक आमदारांसह ते सत्तेत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. राज्यातलं सरकार आणखी मजबूत झालं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदे गटाला अपात्र ठरवल्यास मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतील. राज्याच्या विधानसभेत सध्या २८६ आमदार आहेत. त्यामुळे बहुमतासाठी १४४ आमदारांचं संख्याबळ गरजेचं आहे. शिंदेंसोबत १६ आमदार अपात्र ठरल्यास विधानसभेतील सदस्यांची संख्या २७० वर येईल. त्यामुळे बहुमतासाठी १३६ आमदारांचा पाठिंबा गरजेचा असेल.
...तर कोणीच अपात्र नाही; सगळ्यांची आमदारकी वाचणार? 'त्या' शिंदेंनी वेगळीच शक्यता सांगितली
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची बेरीज १८८ वर जाते. भाजपचे १०४, अजित पवारांचे ४१ आणि एकनाथ शिंदेंचे ४० आमदार आहेत. शिंदेंचे १६ आमदार ठरल्यास त्यांचं संख्याबळ २४ वर येईल. सत्ताधारी आमदारांची संख्या १८५ वरुन १६९ वर येईल. बहुमताचा आकडा १३६ असल्यानं महायुतीला सत्ता राखता येईल. याचा अर्थ निकाल विरोधात गेला तरीही सरकार कायम राहील, पण नेतृत्त्व बदल होईल.
आज अपात्र ठरल्यास शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. नवं सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होतील. अशा परिस्थितीत अजित पवार किंगमेकर ठरतील. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी १३६ आमदारांचं संख्याबळ लागेल. त्यात अजित पवारांचे ४१ आमदार असतील. ही संख्या वजा केल्यास भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांचा आकडा १२८ पर्यंत जातो. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी अजित पवारांची गरज लागेल. त्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही.
शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लान बी काय? कोण होणार मुख्यमंत्री? अशी असू शकतात समीकरणं
शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार अपात्र ठरल्यास अजित पवारांची पाचही बोटं तुपात असतील. सत्ता कायम राखण्यासाठी भाजप अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपद देऊ शकतो. ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्रिपद दिलं होतं. त्याचप्रकारे अजित पवारांना राज्याचं नेतृत्त्वं दिलं जाईल. सध्याच्या घडीला भाजपसाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. विधानसभा निवडणुकीलाही अवघ्या काही महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे भाजप अजित पवारांकडे मुख्यमंत्रिपद देऊ शकतो.
टिप्पणी पोस्ट करा