Ajit Pawar : पार्थ आणि गजा मारणे यांची भेट म्हणजे अत्यंत चुकीची घटना; अजित पवारांनी मुलाला फटकारले

 

ब्युरो टीम : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली. कारण कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारीला हत्या झाली होती. त्या प्रकरणात मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गजानन मारणे याची भेट घेतल्यामुळे चर्चा सुरु झाली. या प्रकरणात आता अजित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी स्वत:च्या मुलास फटकारले आहे, असे अजिबात घडता काम नये, याबाबत मी पार्थशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

नेमके काय म्हणाले अजित पवार

पार्थ आणि गजा मारणे यांची भेट म्हणजे अत्यंत चुकीची घटना आहे. मी त्याच्याबद्दल माहिती घेत आहे. पार्थसोबत जे कार्यकर्ते गेले, ते त्याला तिथे घेऊन गेले. असा प्रकार अजिबात घडता कामा नये. पार्थशी माझी भेट झाल्यावर त्याला मी सांगणार आहे. माझ्याकडून एकदा अशी घटना घडली होती. पण जेव्हा मला कळले त्यादिवशी त्या व्यक्तीला पक्षातून काढले, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

कोण आहे गजा मारणे

गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तो मारणे टोळीचा मुख्य म्होरक्या आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती. या खून प्रकरणात तो तीन वर्ष येरवडा कारगृहात होता. पार्थ पवार गजा मारणे याला भेटले तेव्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने