Amir Khan : बाप असल्याचे कर्तव्य निभावतोय अमीर; मुलीच्या लग्नात स्वत:सर्व जबाबदाऱ्या सांभाळतोय

 

ब्युरो टीम : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि श्रीमंत अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून लेक आयरा खान हिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 3 जानेवारी रोजी आयरा खान बिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत कोर्ट मॅरिज केलं आहे. आता पारंपरिक पद्धतीत उदयपूर याठिकाणी आयरा – नुपूर यांचं लग्न होत आहे. लग्नात आमिर खान याच्या दोन्ही पत्नी देखील उपस्थित आहेत. पण आमिर खान याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान आणि आयरा – नुपूर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

लेकीच्या लग्नात आमिर खान जावयाची आणि जावयाच्या कुटुंबाची काळजी घेताना दिसत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्यांचा महाराष्ट्रीयन लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हिंदू पद्धतीत आमिर खान याच्या लेकीच्या विवाहसोहळा संपन्न होत आहे. आमिर खान लेकीच्या लग्नात व्यक्तिगत रित्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवताना दिसत आहे. लग्नात आलेल्या प्रत्येकाची आमिर खान काळजी घेत आहे.

लेकीचं लग्न आठवणीत  राहाता यावं म्हणून आमिर खान सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध लोकप्रिय आणि श्रीमंत अभिनेता असला तरी आमिर खान लेकीच्या लग्नात स्वतः सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत आहे. मोठ्या पडद्यावर अनेक भूमिका साकारुन प्रसिद्धी झोतात आलेला आमिर खान लेकीच्या लग्नात वडिलांची भूमिका बजावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील आमिर खान याच्या लेकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. चाहते देखील व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते.

काही महिन्यांपूर्वी आयरा – नुपूर यांचा साखरपुडा झाला होता. नुपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे. त्याने आमिर, सुश्मिता सेन आणि इतर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग दिलं आहे. सोशल मीडियावर देखील नुपूर कायम सक्रिय असतो.

आयरा आणि नुपूर यांच्या वयातील अंतर

आयरा हिचा पती नुपूर तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठा आहे. आयरा 26 वर्षांची आहे, तर नुपूर 38 वर्षांचा आहे. आमिर खान याची लेक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील आयरा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आयरा कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने