Amol Kolhe : श्री. कुकडेश्वर पावणार, पण कोणाला? जुन्नरकरांनो,२०१९ चा तो चुनावी जूमला नव्हता! - खा.अमोल कोल्हे

 

ब्युरो टीम : गेल्या २५-३० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या आदिवासी बांधव व जुन्नरच्या तमाम जनतेच्या आस्थेचा असलेल्या कुकडेश्वर मंदिराचे पुनर्जीवन होणार आहे. आतापर्यंत या मंदिराचा विकास व्हावा, त्यावर कळस बसविला जावा, अशा मोठमोठ्या गप्पा झाल्या, पण शाश्वत विकास होण्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा करावा लागतो, शर्थीचे प्रयत्न करावे लागतात व त्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते! पण जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नसेल तोपर्यंत अशी काम पूर्णत्वास जात नाही! आपल्या लोकांना result लागतो, त्यांना प्रयत्न ऐकायचे नसतात!

पुरातत्व विभाग, संसद आणि महाविकास आघाडी पासून राज्यात स्थापन झालेल्या विविध सरकार मधील मंत्र्यांसोबत केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा.. हे कोणी केलं? प्रश्न २५-३० वर्षे जुना आहे, पण त्यासाठी २०१९ मध्ये एका सर्व सामान्य कुटुंबातील उमेदवाराला नेतृत्वाची संधी मिळावी लागली आणि मग सुरू झाले विकासाचे शाश्वत प्रयत्न! होय, खा डॉ अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून च कुकडेश्वर मंदिराच्या विकासासाठी तब्बल दोन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासोबतच मंदिरावर कळस बसविण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात कुकडेश्वराला निधी मिळाला नव्हता, ते काम खा डॉ अमोल कोल्हे यांनी करून दाखवल आहे. तसा शब्दही त्यांनी निवडणुकीपूर्वी दिला होता, पण तो चूनावी जुमला असावा, असा विरोधकांचा आरोप पूर्णपणे खोटा ठरला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने