ब्युरो टीम : बिग बॉस 17 हे सुरूवातीपासूनच तूफान चर्चेत राहिले. बिग बॉस 17 जरी चर्चेत असले तरीही या सीजनला म्हणावा तसा धमाका टीआरपीमध्ये करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसले. आता बिग बॉस 17 च्या फिनालेला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. हेच नाही तर बिग बॉस 17 ला टाॅप 5 फायनलिस्ट देखील मिळाले आहेत. बिग बॉस 17 ला आता 100 दिवसांपेक्षाही अधिक कालावधी झालाय. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा ही बघायला मिळतंय.
मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांच्या दोघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस होणार असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर रिपोर्टनुसार वोटिंग ट्रेंडनुसार अभिषेक आणि मुनव्वर फारूकी यांच्यात चुरस आहे. दोघांपैकी एकजणच बिग बाॅस 17 चा विजेता होईल. मुनव्वर फारूकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुळात म्हणजे मुनव्वर फारूकी याचा सुरूवातीपासून जबरदस्त गेम बिग बाॅस 17 च्या घरात बघायला मिळाला. आयशा खान ही बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झाल्यानंतर कुठेतरी मुनव्वर फारूकी याचा गेम खराब झाला. मात्र, यादरम्यान नक्कीच मुनव्वर फारूकी याला लोकांची सहानुभूती नक्कीच मिळाली.
दुसरीकडे अभिषेक कुमार हा बिग बाॅस 17 च्या घरात नेहमीच वाद करताना दिसला. सतत अभिषेक कुमार याचे भांडणे बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. मात्र, आता विजेतेपदासाठी त्याला प्रबळ दावेदार नक्कीच मानले जात आहे. आता अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारूकी यांच्यापैकी कोण होणार विजेता हे पाहण्यासाठी ठरणार आहे.
दुसरीकडे मनु पंजाबी हा अंकिता लोखंडे हिला सपोर्ट करताना दिसतोय. फक्त मनु पंजाबी हाच नाही तर अनेक टीव्ही आणि बाॅलिवूड कलाकार हे अंकिता लोखंडे हिलाच सपोर्ट करत आहेत. मात्र, लोकांना फार जास्त अंकिता लोखंडे हिचा बिग बाॅस 17 मधील गेम आवडला नसल्याचे दिसतंय. आता बिग बाॅस17 चा विजेता नेमका कोण होणार हे पाहण्यासारखे नक्कीच ठरेल.
टिप्पणी पोस्ट करा