ब्युरो टीम : टीम इंडियाचा शिलेदार आणि राहुल द्रविडचा क्रिकेटमधील वारसदार चेतेश्वर पुजारा याने मोठा कारनामा केला आहे. चेतेश्वर पुजारा याने नागपुरातील विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये सौराष्ट्रकडून खेळताना विदर्भ विरुद्ध महारेकॉर्ड केला आहे. पुजाराने एलीट ग्रुपमध्ये सौराष्ट्र विरुद्ध अर्धशतकी खेळी करुन इतिरास रचला आहे. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. पुजारा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चौथा आणि पहिला सक्रीय फलंदाज ठरला आहे.
चेतेश्वर पुजारा याने सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावात 137 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. पुजारा या खेळीच्या मदतीने दिग्गजाच्या पंगतीत जाऊन बसला. पुजारा, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर 20 हजार धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. पुजाराला विदर्भ विरुद्धच्या सामन्याआधी 20 हजार धावांसाठी 96 धावांची गरज होती. मात्र पुजारा पहिल्या डावात 43 धावांवर आऊट झाला. मात्र दुसऱ्या डावात त्याने 66 धावा केल्या. अशाप्रकारे पुजाराने मोठा कीर्तीमान केला.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुनील गावसकर यांच्या नावावर सर्वाधिक 25 हजार 834 धावांची नोंद आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 25 हजार 396 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल द्रविडच्या खात्यात 23 हजार 794 धावा आहेत.
पुजाराची फर्स्ट क्लास कारकीर्द
दरम्यान चेतेश्वर पुजारा याने आतापर्यंत खेळलेल्या 260 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 61 शतक आणि 78 अर्धशतकं लगावली आहेत. तसेच पुजाराने 17 द्विशतकं झळकावली आहेत. पुजाराने काही दिवसांपूर्वीच झारखंड विरुद्ध खेळताना 243 धावांची अफलातून खेळी केली होती.
चेतेश्वर पुजारा 20 हजार मनसबदार
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), धुर्व शौरी, करुण नायर, अथर्व तायडे, हर्ष दुबे, आदित्य सरवटे, आदित्य ठाकरे, जितेश शर्मा, संजय रघुनाथ, उमेश यादव आणि यश ठाकुर.
सौराष्ट्र प्लेईंग ईलेव्हन | जयदेव उनाडकट (कॅप्टन), हार्विक देसाई (विकेटकीपर), शेल्डन जॅक्सन, चेतेश्वर पुजारा, अर्पित वसावडा, प्रेरक मांकड, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, आदित्य जडेजा, केविन जीवराजानी आणि विश्वराज जडेजा.
टिप्पणी पोस्ट करा