ब्युरो टीम : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवल्यानंतर टीम इंडिया नववर्षातील पहिली आणि टी 20 मालिका खेळण्यासाठी तयार आहे. टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या सीरिजसाठी टीममध्ये 14 महिन्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची एन्ट्री झाली आहे. तसेच काहींना विश्रांती देण्यात आली आहे. दोन्ही संघात पहिल्यांदाच ही टी 20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना गुरुवारी 11 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना हा मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळणार?
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी 20 सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे पाहता येईल.
पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमची क्षमता किती?
पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमची क्षमता ही 30 हजार इतकी आहे. म्हणजेच एकावेळेस 30 हजार क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये येऊन सामना पाहू शकतात.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.
टिप्पणी पोस्ट करा