ब्युरो टीम : टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. ओली पोप याची 196 धावांची खेळी टीम इंडियाकडे असलेल्या 190 धावांवर भारी ठरली. टीम इंडियाची विजयासाठी मिळालेल्या 231 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झाली. टीम इंडिया 28 धावांनी पराभूत झाली. इंग्लंडने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे करण्यात आलं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लडची सूत्रं आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली. टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि बॅट्समन केएल राहुल हे दोघे दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले. तर त्यांच्या जागी टीम इंडियात तिघांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआय निवड समितीने डोमेस्टिक क्रिकेटचा किंग सरफराज खान याला संधी दिली आहे. तसेच सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचाही समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने दुसऱ्या सामन्यासाठी करण्यात आलेल्या बदलानंतर टीम इंडिया स्क्वाडचा फोटो ट्विट केला आहे.
सरफराज की रजत पाटीदार?
दरम्यान केएल राहुल बाहेर पडल्याने आता त्याच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. जागा एक आणि दावेदार अशी स्थिती आहे. रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यात एका जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. दोघांपैकी ज्याला संधी मिळेल, त्याचं हे कसोटी पदार्पण ठरेल. आता टीम मॅनेजमेंट कुणाचा विचार करते, हे काही तासांमध्येच स्पष्ट होईल.
अशी आहे टीम इंडिया
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
टिप्पणी पोस्ट करा