ब्युरो टीम : “राजपत्र घेतलं. मराठा समाजाला मिळवून दिलं. हा सगळा विजय मराठा समाजाचा आहे. माझ्या भावांच स्वप्न पूर्ण झालं. आरक्षणासाठी खूप संघर्ष केला. मराठा समाज खूप लढला. बलिदान दिलेल्या भावांच स्वप्न आज पूर्ण झालय. कुटुंब उघडण्यावर पडलं, आई-बहिणीच्या कंपाळाच कुकुं गेलं. हे सोप नव्हतं. आरक्षणासाठी 250 ते 300 पोरांनी बलिदान दिलयच. आज त्यांच स्वप्न साकार झालं. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “कायदा पारित होणार नाही, असं म्हणायचे काही लोक, आमच्यातले पाच-पन्नास लोक जळणारे होते, आता कायदा आणला का नाय खेचून” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
तुम्ही दोन उपोषण केली. दुसर उपोषण अन्न-पाण्याशिवया केलं, त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांना विचारलं, ते म्हणाले की, “इथून पुढेही मराठा समाजासाठी आमरण उपोषण करीन, मी प्राण द्यायलाही तयार आहे. सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ नाही बसणार हा पठ्ठ्या शेवटपर्यंत लढणार” मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सर्व चॅनल, वर्तमानपत्र, कॅमेरामन्सचे आंदोलनाच्या लढयात साथ दिल्याबद्दल मनापासून आभार मानले.
‘मी अपमान सहन केला’
“आरक्षण मिळणार नाही, कायदा मंजूर होणार नाही असं काही लोक म्हणायचे. मी अपमान सहन केला, आज आरक्षण खेचून आणलं का नाही?सगेसोयरे शब्दाचा समावेश झाला. हे सोप नव्हतं. मुंबईत गुलाल उधळणार बोललेलो, त करुन दाखवलं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करायचे, त्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे लगेच म्हणाले, ‘ए आजच्या चांगल्यादिवशी त्याच नाव सुद्धा घ्यायच नाही हट’
टिप्पणी पोस्ट करा