politics ; राजकारणात येणाऱ्या साधू संतांची संख्या वाढली; नाशिक आणि संभाजीनगरमधून 'या' चार नावांची चर्चा

 

ब्युरो टीम : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे .यंदाच्या निवडणुकीत एकूणच राम मंदिर फीवर बघता नाशिकच्या राजकीय आखाड्यात साधू महंतांनी उडी घेतली आहे. त्यामुळे प्रस्थापित कार्यकर्त्यांना बाजूला सारून सर्वपक्षीय साधू महंतांना उमेदवारी देणार का याची चर्चा सध्या सुरू आहे. आयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराच्या भव्य दिव्य सोहळ्यानंतर राजकीय पटलावर आता साधू महंतांचा वावर वाढला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघासाठी तब्बल तीन ते चार साधू महंतांनी तयारी सुरू केली आहे.

नाशिक आणि संभाजीनगरमधून लढण्याची जोरदार तयारी

उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्यात मोठा भक्त परिवार असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी नाशिक किंवा छत्रपती संभाजी नगरमधून उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे त्रंबकेश्वर स्थित स्वामी श्री कंठानंद यांनी देखील आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. नाशिकच्या आध्यात्मिक क्षेत्रात मोठ नाव असलेले महंत अनिकेत शास्त्री महाराज देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत आहेत.

देशात सध्या भाजपची लाट असल्याचं दिसत असल्याने साधुसंतांची पहिली पसंती थेट भाजपलाच असली तरी वेळेवर मात्र भाजपकडून तिकीट न मिळाल्यास इतर पर्याय देखील शोधले जात आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत स्पष्ट बोललं जात नसलं तरी मुनगंटीवार यांनी मात्र बाबा राजकारणात आले तर चालेल मात्र राजकीय नेते बाबा व्हायला नको अशी मिश्किल टिप्पणी केली.

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक शिवसेनेचा मतदार संघ असून हेमंत गोडसे सलग दोन टर्म नाशिकमधून खासदार म्हणून निवडून जात आहेत. यंदा देखील भाजप आणि शिंदे गट यांच्यात काय निर्णय होतो यावर इथला उमेदवार अवलंबून असला तरी साधू महंतांनी मात्र शड्डू ठोकल्याने नाशिक लोकसभा निवडणुकीची रंगत वाढणार एवढं मात्र निश्चित आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने