ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये रिडिंग सर्कल ग्रुप च्या वतीने महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथाचे वाचन करून रोहित वेमुला यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठामधील वेगवेगळ्या विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन एक Reading Circle नावाचा उपक्रम चालू केला आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की आठवड्यातून एक दिवस सर्व विद्यार्थींनी एकत्रित येऊन महापुरुषांच्या विचार आणि कार्याचे तसेच त्यांच्या ग्रंथांचे वाचन करणे . यामध्ये आतापर्यंत *महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, इ. मी महापुरुषांच्या ग्रंथाचे वाचन करण्यात आले आहे . आणि येणाऱ्या पुढील काळात अजून इतरही मान्यवर व्यक्तींच्या ग्रंथाचे सामुहिक वाचन, चिंतन, मनन करण्यात येणार आहे. आज महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथाचे सामुहिक वाचन करून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोट
1 ) रिडिंग सर्कल ग्रुप च्या माध्यमातून आम्ही महापुरुषांच्या जीवन, कार्य आणि विचारांचे मंथन करतो आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाच्या वाचनाने या सर्कलची सुरूवात करण्यात आली. सध्या आम्ही सर्व विद्यार्थी महात्मा फुले यांच्या साहित्याचे वाचन करत आहोत. विद्यापीठामधील विद्यार्थींना आम्ही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत.
- ओम बोरले ( समन्वयक - रिडिंग सर्कल, स्त्री अभ्यास केंद्र)
टिप्पणी पोस्ट करा