ब्युरो टीम : नेवासा तालुक्यातील खामगाव नं.२ येथे श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या उपक्रमार्थ २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य दिंडी मिरवणूक, भजन, श्रीराम कथा, श्री राम जप, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे श्री राम लल्लांचेे मोठ्या उत्साहात स्वागत केले असून राम दिवाळी साजरी करण्यात येत आहे.
या भव्य सोहळ्यामध्ये सर्व धर्मातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकात्मतेचा संदेश दिला व जय श्री राम जय घोष करत चराचर राममय केेला.मुस्लिम समाजातील पठाण कुटुंबीयाने दिंडी मिरवणूकीत फुगडी खेळत प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्या आगमनाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी पोषाख परिधान करत दिंडी सोहळ्यात भगवे झेंडे व कलश घेऊन सहभागी झाले, चिकणी खामगाव भजनी मंडळनेे उत्कृष्ट भजनाने श्री रामांंच्या आगमनाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ह.भ.प.कृष्णा महाराज जगदाळे यांच्या वानितून श्री राम कथा यावेळी ग्रामस्थांनी श्रवण केली.
या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री राम प्राणप्रतिष्ठा प्रतिनिधी श्री.सचिन काळे, श्री.पांडूआप्पा आगळे, श्री.चंद्रहास आगळे,श्री.साहेेबराव(आबा) आगळे, श्री.राजेंद्र पा. घुले, श्री.अशोक पा.आघम व समस्त चिकणी खामगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.
(जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित नेवासा तालुक्यातील खामगाव येथे श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमीत्त आयोजीलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये पठाण मुस्लीम बांधवांनी सहभागी होत फुगडी खेळत श्रीराम लल्लांचे जल्लोषात स्वागत केले)
यावेळी सार्थक रासकर, समिक्षा रासकर व मिनाक्षी भवर या शालेय विद्यार्थ्यांनी सिता-राम, लक्ष्मण यांची वेशभूषा करत अत्यंत सुंदर अशी भूमिका साकारली. या वेळी मुख्याध्यापक श्री. ढोकणे सर, श्री.बंडू(आबा) काळे, श्री.बाबासाहेब आघम, श्री.राजेंद्र मेेथे, श्री.बाबासाहेब काळे साहेब, श्री.बाबासाहेब भुुमकर, श्री.देविदास काळे, श्री.पाडुरंग काळे, श्री. बाबासाहेब घुले, श्री.उमेश आगळे, श्री.बन्सी साबळे,श्री.कारभारी साबळे, श्री.नामदेव काळे, श्री.दादाराम आघम, श्री. राजू पठाण,श्री.सचिन आघम, श्री.आमोल आगळे, श्री.पांडुरंग रासकर, श्री.हरिभाऊ खराडे, श्री.ज्ञानदेव घुले, श्री. सुखदेव भुुमकर, श्री.रामकिसन शिंदे, श्री.घुले गुरुजी, श्री. इंगळे गुरुजी आदी मान्यवर व समस्त खामगाव नं.२ ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा