ST : जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित खामगाव, रामडोह,वरखेड गावासाठी शालेय बससेवा सुरू

 

रा.प.म नेवासा आगाराणे बस सुरु करताच विद्यार्थी-ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त 

ब्युरो टीम : रा.प.म नेवासा आगाराची जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित खामगाव, रामडोह,वरखेड गावासाठी शालेय बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी-ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित चिकणी खामगाव, रामडोह, वरखेड हे नेवासा तालुक्यातील तसेच अहमदनगर जिल्ह्यातील टेल ची गावे असून, गोदावरी नदीवर बांधलेल्या नाथसागर जलाशय बॅकवॉटर विभागातील जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित अविकसित गावेे आहेत. 

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला जेथून ज्ञानेश्वरी सांगितली अशा श्री क्षेत्र नेवासा तिर्थक्षेत्रापासून अवघ्या २५ किमी अंतरावर ही गावेे असून या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. या गावांतील नागरिकांना जिल्हा,तालुका तसेच इतर कोणत्याही ठिकाणी (चिकणी खामगाव-गोपाळपूर किंवा चिकणी खामगाव-वरखेड मार्गे) शेतीच्या, शाळेच्या, शासकीय, दवाखानाच्या कामासाठी खड्डय़ातून मार्ग काढत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. 

चिकणी खामगाव व रामडोह या गावामध्ये ४थी पर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वरखेड,जळका व नेवासा येथे जावे लागते. चिकणी खामगाव- रामडोह- वरखेड अंतर ३.५ किमी पेक्षा जास्त असल्याने शालेय मुले व मुली यांना उसाच्या शेतातून, चारीने जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने पायी प्रवास करावा लागत असे. पावसाळ्यात तर दलदलीच्या रस्त्यातून अक्षरक्षः कसरत करत प्रवास करावा लागत असे, बहुतांश वेळा विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागत असे. यामुळे विद्यार्थ्यांचे खूपच शैक्षणिक नुकसान होत होते. 

विद्यार्थ्यांना शाळेसाठी व ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी प्रवासासाठी अत्यंत गैरसोय होत आहे याची जाणीव शिवसेना वैद्यकीय अहमदनगर(उत्तर) जिल्हा प्रमुख श्री.सचिन काळे यांना होताच, तात्काळ मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयशी संपर्क करत श्री.सचिन काळे यांनी रा.प.म नेवासा आगाराची चिकणी खामगाव रामडोह मार्गे बस सुरु करण्याची मागणी केली. 

१) "चिकणी खामगाव येथून नेवासा" :- सकाळी ०७:०० वा., सकाळी ०९:१५ वा., सकाळी ११:१५ वा. व  सायं.०५:१५ वा. तसेच, २) "नेवासा येथून चिकणी खामगाव" :- सकाळी ०८:३० वा., सकाळी १०:१५ वा., सायं.०४:०० वा. व सायं ०६:०० वा. वरिल वेळेनुसार बस फेरी सुरू केल्या. 

या बस सेवेमुळे खामगाव, रामडोह, वरखेड, शिरसगाव, गिडेगाव, सलाबतपूर, जळका, खडकाफाटा या गावांतील विद्यार्थी, ग्रामस्थ, रूग्ण, शेतकरी, भावीक, शासकीय-खाजगी कर्मचारी, पाहुणे प्रवासी यांची प्रवासाची सोय झाली असून सर्व क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. १२ वी पर्यंत विद्यार्थिनींना मोफत शालेय प्रवास पास सुविधा असल्याने विद्यार्थिनींमधून खूपच आनंद व्यक्त होत आहे. ७५वर्षे वरिल सर्व प्रौढांना मोफत प्रवास व महिलांना ५०% तिकीट सवलत असल्याने ग्रामस्थांमधूनही आनंद व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने