sunny Nimhan : यंदाचा 'युवारत्न' पुरस्कार उद्योजक सनी निम्हण यांना प्रदान; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयुटच्या वतीने ७ व्या युवा संसदेचे आयोजन

 

स्वत: आर्थिक सक्षम बना; मगच सामाजिक, राजकीय कार्यात उडी घ्या - उद्योजक सनी निम्हण 

ब्युरो टीम : IT म्हणजे Information Technology नसून Indian Talent आहे. भारतीय युवकांमध्ये भरपूर गुणवत्ता असून मात्र त्यांनी राजकरण समाजकारण करण्यापूर्वी स्वत: आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. यातूनच नक्की प्रत्येकाची प्रगती होईल व भारताचा सर्वागीण विकास साध्य होईल से प्रतिपादन यंदाचा 'युवारत्न' पुरस्कार विजेते उद्योजक सनी निम्हण यांनी केले आहे. 

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयुटच्या वतीने ७ व्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता हा उपक्रम राबवत आहे. 

संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'युवारत्न' पुरस्कार उद्योजक सनी निम्हण यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे होते.  

 पुढे बोलताना सनी निम्हण म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून केली. मंडळाची वर्गणी गोळा करतांना घरूनच जेवण करून गेल्याने बाहेरच्या खाण्यावर मंडळाचा वर्गणीचा पैसा वाचतो. मंडळाचा कार्यकर्ता म्हणून जो अनुभव मला मिळाला त्याचा वापर मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात देखील करतो, मला त्याचा खूप होत आहे. तुम्ही देखील अगोदर स्वत: आर्थिक सक्षम बना मगच आपल्या विचारधारेनुसार सामाजिक राजकीय वाटचाल करा असे मत उद्योजक सनी निम्हण यांनी व्यक्त केले आहे. 

यावेळी व्यावसायिक सल्ला देताना, आजच्या तरुणांना माहित आहे, की हा '5D' चा जमाना आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक, व्यावसायिक जीवनात काम करत असतांना '3D' प्रिन्सिपल मध्ये बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे आपल्यादेखील Determination, Dedication, Devotion यांच्या सोबत  Desire आणि Discipline यांचा सामावेश करून नव्या '5D' मॉडेल नुसार काम करावं लागेल. या दोन्ही पद्धती एकत्र करून जर आजच्या युवकांनी काम केलं तर नक्कीच आपण सशक्त भारताकडे वाटचाल करू असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी खासदार संजय जाधव, खासदार ओमराजे निंबाळकर, मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुलराव जाधवर हे उपस्थित होते.


 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने