ब्युरो टीम : राजस्थानचे मंत्री सुरेंदरपाल सिंग यांनी अखेर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. करणपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. काँग्रेस नेते रुपिंदर सिंग कुन्नर यांनी भाजपच्या मंत्र्यांचा पराभव केला होता. सुरेंदरसिंग पाल यांना भाजपनं ते करणपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे उमेदवार असताना देखील मंत्री केलं होतं. यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता.
सुरेंदरपाल सिंग यांचा काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंग यांनी ११ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. सुरेंदरपाल सिंग यांनी भजनलाल शर्मा यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे स्वतंत्र पदभार देण्यात आला होता. भजनलाल शर्मा यांनी ३० डिसेंबर २०२३ रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. ५ जानेवारी रोजी त्यांना अल्पसंख्यांक विकास, कृषी विपणन यासह विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली होती.
काँग्रेसनं सुरेंदरपाल सिंग यांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेतला होता. आचारसंहितेचं उल्लंघन केल्यासंबंधी आक्षेप घेतले होते. करणपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराचं निधन झाल्यानं निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती.
...तर कोणीच अपात्र नाही; सगळ्यांची आमदारकी वाचणार? 'त्या' शिंदेंनी वेगळीच शक्यता सांगितली
सुरेंदरपाल सिंग यांनी यापूर्वी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या सरकारमध्ये दोन वेळा मंत्रिपद भूषवलं होतं. २००३ आणि २०१८ मध्ये ते मंत्री बनले होते. २००३ ला ते कृषीमंत्री होते. तर, २०१८ मध्ये ते पेट्रोलियम मंत्री होते. आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी एकनाथ शिंदेंचं रोखठोक भाष्य, राहुल नार्वेकरांसोबतच्या भेटीचं कारणही सांगितलं
राजस्थानात काँग्रेसचा पराभव केल्यानंतर भाजपनं भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केलं होतं. भाजपला १९९ पैकी ११५ जागांवर विजय मिळाला होता. तर, काँग्रेसला ६९ जागांवर विजय मिळाला होता. आता, काँग्रेसचं संख्याबळ वाढून ७० झालं आहे. दिव्या कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना भाजपनं उपमुख्यमंत्री केलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा