Unesco World Heritage : यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव;2024-25साठी केंद्राने पाठविली १२ किल्यांची यादी

 

ब्युरो टीम : नेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकनं पाठवत असतो. यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. यामध्ये किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे. 

2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा काळातील किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी भारत नामांकन देणार आहे. हे किल्ले सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, युनेस्कोच्या या यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रीय राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतील तीन सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे. 

भारताकडून छत्रपती शिवरायांच्या गडकोटांची शिफारस 

युनेस्कोच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणाऱ्या किल्ल्यांच्या नावांमध्ये महाराष्ट्रातील साल्होर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेली किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्गातील किल्ला आणि तामिळनाडूतील गिंगी किल्ला यांचा समावेश आहे. भारताकडून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची शिफारस केली जाणार आहे. 

महाराष्ट्रातील एकूण 390 पैकी 12 मराठा काळातील किल्ले

महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. त्यापैकी फक्त बारा किल्ले मराठा काळातील असल्याचं सांगितलं जात आहे. यापैकी आठ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. यामध्ये शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि गिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. तर उर्वरित साल्हेर किल्ला, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयानं संरक्षित केले आहेत. 



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने