ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला मिळाल्यानंतर, आज मंत्रालय परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने "घड्याळ तेच वेळ नवी" या टॅग लाईनचे बॅनर लावले असून या वर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना स्थान देण्यात आलेले नाही, त्या ऐवजी आता यशवंतराव चव्हाण यांना बॅनर वर स्थान देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट बाहेर पडल्यानंतर त्यांच्या तर्फे लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बॅनर वर शरद पवार यांचे फोटो दिसत असत, परंतु कालच्या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचा फोटो येथून पुढे दिसणार नाही का असा प्रश्न नागरिकांना कडून सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने दिला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा