Ajit Pawar : मुंबईत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मुस्लीम चेहरा मिळणार; काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार

 

ब्युरो टीम : महाराष्ट्रात काँग्रेसला नुकताच मोठा झटका बसला होता. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी 55 वर्षांपासून काँग्रेसशी असलेले नाते संपुष्टात आणले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते नुकतेच दाखल झाले. त्यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्धीकीसुद्धा आता काँग्रेसची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बाबा सिद्धीकी अजित पवार गटाच्या संपर्कात आहे. बुधवारी रात्री बाबा सिद्धीकी आणि त्यांचा मुलगा जीशान याने अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ बाबा सिद्धीकी यांच्या रुपात काँग्रेसला दुसरा धक्का लागणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

कोण आहेत बाबा सिद्दीकी

बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली होती. बाबा पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून बाबांचा पराभव झाला होता.

बाबा जियाउद्दीन सिद्दीकी मूळचे बिहारमधील पटना येथील आहेत. परंतु त्यांचे राजकीय क्षेत्र मुंबईच राहिले. बाबा सिद्दीकी यांची मुलगी अर्शिया सिद्दीकी डॉक्टर आहे. त्यांची पत्नी शहजीन गृहिणी आहे. वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांचा चांगला दबदबा आहे. काँग्रेसकडून ते मंत्री राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत एक मुस्लिम चेहरा हवा आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीी काँग्रेसचे हे काम पूर्ण होणार आहे.

बाबा सिद्दीकीला राष्ट्रवादीची गरज का ?

बाबा सिद्दीकी 2017 अंलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आहेत. झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प (एसआरए) प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. मनी लॅन्ड्रींग प्रकरणात त्यांची 462 कोटी संपत्ती 2018 मध्ये ईडीने जप्त केली आहे. तसेच ED ने 108 कोटी मनी लॅन्ड्रींग प्रकरणात बाबा सिद्दीक यांच्यावर कारवाई केली आहे. 2012 मध्ये या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल झाला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने