ब्युरो टीम : आगामी लोकसभा निवडणूकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कोणते पक्ष महायुतीमध्ये सामील होतात आणि कोणते पक्ष इंडिया आघाडीमध्ये राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर महाराष्ट्रात आता राजकीय गणित बदलली गेली आहेत. भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत मात्र ठाकरे बाजुला पडलेत. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे मात्र शरद पवार नाहीत. वरिष्ठ मंडळ उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार का? या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
अमित शाहा काय म्हणाले?
मला तुमचीही गरज आहे. तुम्ही ज्वाईन करा. आमचा पक्ष परिवार नियोजन मानते. पक्षातील कार्यकर्त्याचं परिवार नियोजन मानत नाही. भाजपच्या अजेंड्याशी जे सहमत आहेत त्या सर्वांचं भाजपात स्वागत आहे. आमच्या अजेंड्यावर चालायचं आहे फक्त असं शाहा म्हणाले. यावेळी त्यांना नितीश कुमार यांना आणि उद्धव ठाकरे यांन सोबत घेण्याबाबत विचारण्यात आलं.
तुम्ही राँग नंबरवर प्रश्न करत आहात. तुम्ही नितीश कुमार यांना विचारा. आमचा पक्ष फर्म आहे. आमच्या पक्षाचा अजेंडा ज्यांना मान्य आहे, मोदींचा विश्वास ज्यांच्यावर आहे त्यांनी आमच्यासोबत यावं. जनता मतदान करणार आहे. निकाल येऊ द्या. माहीत पडेल कुणाची विश्वासहार्यता वाढली आणि कमी झाली आहे, असं शाहा म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांचं नाव घेताच, यात अगर मगर नाही. कोणतीही हेडिंग मिळणार नाही. थेट निवडणुकीचे प्रश्न विचारा नाही तर तुमची वेळ संपेल, असं म्हणत शाहांनी उत्तरच देणं टाळलं.
भाजपने काँग्रेसच्या अनेक लोकांना भारतरत्न दिला. नरसिंहराव आणि तरुण गोगोईंना भारत रत्न दिला त्यातून काय मिळणार आम्हाला. दादा दादी, आजी आजोबांना भारतरत्न द्यायला ही काँग्रेस नाही. हा भाजप आहे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांना सन्मानित करणार आणि केलां पाहिजे. सरदार पटेल यांना भारत रत्न देण्यासाठी किती वर्ष लागले. चंद्रशेखर आले नसते तर कदाचित तोही मिळाला नसता. भाजपने भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांवर ज्यांचा अधिकार त्यांना तो दिला. पूर्वी पत्रकारांच्या शिफारशींवरही पुरस्कार दिला जायचा म्हणत शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
टिप्पणी पोस्ट करा