ब्युरो टीम: 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून उमेदवारांच्या निवडीवर चर्चा करण्यासाठी भाजपची केंद्रीय निवडणूक समिती आज बैठक होणार आहे. राजकीय उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, त्यानंतर किमान 100-120 उमेदवारांची नावे येत्या शनिवार पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह डॉ के लक्ष्मण, वनाथी श्रीनिवासन, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, इक्बाल सिंग लालपुरिया, सुधा यादव, भूपेंद्र यादव, ओम प्रकाश माथूर, बीएल संतोष आणि इतर महत्वाचे नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत नेते 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने गमावलेल्या जागांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. यासाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, भारतीय जनता पक्ष (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा हे भाजप मुख्यालयात कोअर ग्रुप कमिटीची बैठक घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षासाठी ३७० पेक्षा जास्त आणि एनडीएसाठी ४०० पार (४०० च्या पुढे) हा नारा दिला असुन याच अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा निर्धार करून भाजपने निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी भाजपने 'गरीब' (गरीब), युवा (युवा), अन्नदाता (शेतकरी) आणि नारी (महिला) या घटकांवर लक्ष्य केंद्रित करण्याचे ठरवले आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील तीन ते चार प्रमुख नेत्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु राजकीय उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार व महाराष्ट्र येथील भाजपा उमेदवारांची नावे पहिल्या यादीत येण्याची शक्यता धूसर आहे कारण येथे मित्र पक्षांबरोबर जागा वाटप अजून जाहीर झालेले नाही. भाजपच्या लोकसभा उमेदवार यादी मध्ये युवा व महिला उमेदवारांना यावेळस जास्त संधी मिळणार असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा