Cricket : भारताचा तिसऱ्या कसोटी सामन्यात 434 धावांची विजय; इंग्लंड विरुद्ध मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी

 

ब्युरो टीम : टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात 434 धावांची विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 557 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने इंग्लंडला या विजयी धावांचा पाठलाग करताना 39.4 ओव्हरमध्ये 122 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने इंग्लंडला चौथ्याच दिवशी पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासह इतिहास रचला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. यशस्वी जयस्वाल, कॅप्टन रोहित शर्मा, डेब्युटंट सरफराज खान आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा हे चौघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

टीम इंडियासमोर इंग्लंड फुस्स

टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी होती. तर दुसरा डाव हा 430 धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला 557 धावांचं आव्हान मिळालं. मात्र इंग्लंडकडून एकाही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. इंग्लंडकडून मार्क वूड याने सर्वाधिक 33 धावा केल्या. चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर रेहान अहमद झिरोवर आऊट झाला. तर उर्वरित चौघांना 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. तर जेम्स एंडरसन 1 धावेवर नाबाद परतला. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव याच्या खात्यात 2 विकेट्स गेल्या. तर जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन दोघांनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने