Cricket : जयस्वाल द्विशतकी खेळ करण्यात यशस्वी तर सर्फराजचे दुसरे अधर्शतक; भारताने डाव केला घोषित

 

  

ब्युरो टीम : टीम इंडियाने इंग्लंडला तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी 557 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने दुसरा डाव हा 98 ओव्हरमध्ये 4 बाद 430 धावावंर घोषित केला. टीम इंडियाकडे पहिल्या डावातील 126 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने या जोरावर इंग्लंडसमोर 557 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक नाबाद 214 धावांची द्विशतकी खेळी केली. तर डेब्यूटंट सरफराज खान याने झंझावाती नॉट आऊट 68 रन्स केल्या. तर शुबमन गिल याने 91 धावा केल्या.

यशस्वीचं नाबाद द्विशतक

यशस्वीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील आणि इंग्लंड विरुद्धचं दुसरं द्वशतक ठोकलं. यशस्वीने 236 बॉलमध्ये 12 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा केल्या. तर यशस्वीला उत्तम साथ देत सरफराज खान याने 72 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकारांसह नाबाद 68 धावा केल्या. त्याआधी शुबमन गिल याने 91 आणि सरफराज खान याने 27 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन रोहित शर्मा याने 19 धावा जोडल्या. रजत पाटीदार याला भोपळाही फोडता आला नाही. इंग्लंडकडून जो रुट, टॉम हार्टली आणि रेहान अहमद या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

यशस्वी-सरफराजचा तडाखा

दरम्यान यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान या मुंबईकर जोडीने इंग्लंडला झोडून काढला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी डाव घोषित होईपर्यंत 159 बॉलमध्ये नाबाद 172 धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या वादळी खेळीमुळेच टीम इंडियाला 400 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेता आली. दरम्यान आता फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर आता भारतीय गोलंदाजांवर इंग्लंडला गुंडाळण्याची जबाबदारी असणार आहे.

टीम इंडियाचा दुसरा डाव घोषित

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने