ब्युरो टीम : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर होती. मात्र रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने रांचीत धमाका केला. टीम इंडियाने विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडियाने या विजायसह मालिका जिंकली. टीम इंडिया आता या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता या विजयानंतर बीसीसीआय एका दगडात 2 पक्षी मारण्याच्या तयारीत आहे.
बीसीसीआयने काही आडमुठ्या खेळाडूंना वठणीवर आणण्यासाठी आणि निष्ठेने खेळणाऱ्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी काही तरी करतेय. बीसीसीआयच्या या प्लानला आपण डबल गेम म्हणून शकतो. बीसीसीआयने आपल्या या प्लान द्वारे कुणाला न दुखावत पण अद्दल घडवण्यसाठी सज्ज झाली आहे. कसोटी क्रिकेट पर्यायाने रेड बॉल क्रिकेटच्या प्रोत्साहन आणि संवर्धनासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
वार्षिक करारप्राप्त खेळाडूंना रणजी आणि इतर रेड बॉल क्रिकेटमध्ये खेळावं लागेल,असं काही दिवसांपूर्वी बीसीसआय अध्यक्ष जय शाह म्हणाले होते. मात्र त्यानंतरही ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी जुमानलं नाही. तर दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कपमध्ये दुखापतग्रस्त झालेला हार्दिक पंड्या हा आयपीएलच्या तोंडावर पुन्हा एकदा फिट झालाय. त्यामुळे या खेळाडूंची रेड बॉलबद्दल असलेली अनास्था जाहीर झालेली आहे. आता रेड बॉल क्रिकेटच्या संवर्धनासाठी बीसीसीआय नवा फंडा आणायच्या तयारीत आहे. वर्षभरात सातत्याने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.
सध्या टीम इंडियाच्या खेळाडूंना वार्षिक करारात श्रेणीनुसार कमाल 7 आणि किमान 1 कोटी रुपये मिळतात. त्या व्यतिरिक्त प्रत्येक टी 20, वनडे आणि कसोटी सामन्यसाठी अनुक्रमे 3, 9 आणि 15 लाख रुपये मिळतात. मात्र यानंतरही काही खेळाडू हे कसोटीऐवजी टी 20 लीग स्पर्धेला प्राधान्य देत आहेत.
बीसीसीआयचा मास्टर प्लान
आता बीसीसीआयच्या या नव्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यास सर्व कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची चांदी होईल. त्यांना वार्षिक करार, सामन्यासाठी मिळणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त प्रोत्साहन म्हणून अतिरिक्त बोनस म्हणून रक्कम दिली जाईल.
टिप्पणी पोस्ट करा