Election : देशभरात लोकसभेची जोरदार तयारी सुरु; पंकजा मुंडे यंदा लोकसभेच्या रिंगणात;

 

ब्युरो टीम :  देशभरात आता लोकसभेच्या निवडणूकांची जोरदार तयारी होत असलेली पाहायला मिळत आहे. सत्ताधारी भाजपने यंदाच्या लोकसभेत 400 चा आकडा पार करण्याचा पक्का निर्धार केलाय. तर राज्यातही जागावाटपाआधी बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्यामुळे आता पंकजा मुंडे विधानसभेला कोणत्या मतदारसंघातून लढणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी त्या बीडमधून लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशातच यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंंडे?

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बूथ रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 2014 आणि 19 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही.  मराठा समाजाने ठरवावे किती आरक्षण हवं आहे की नाही यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केल्याचं म्हणत पंकजा मुंडेंनी अधिक बोलणं टाळलं.

येणार काळ महिलांचा, सत्याच राजकारण करतील- पंकजा मुंडे

राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे कारण येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचा राजकारण करतील असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.. तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने