ब्युरो टीम : ओबीसी आरक्षणला कुठेही धक्का न लावता आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत. मनो जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही, पण मराठा समजाला आरक्षण पटेल, मान्य होईल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व विषयावर आपलं मत व्यक्त केले. उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याशिवाय अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीवरही त्यांनी भाष्य केलेय. तसेच भविष्यात अनेक नेते भाजपमध्ये येतील, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जरांगेंना आरक्षण पटेल की नाही माहित नाही पण मराठा समजाला पटेल -
सध्या मराठा आंदोलन सुरु आहे, त्याला काउंटर ओबीसी आंदोलन सुरु आहे. याला पॉलिटिकल अँगलने मी पाहत नाही. प्रत्येकला जातीतून पाहायचं आहे, हे महाराष्ट्र साठी दुर्दैवी आहे. आम्ही आंदोलनाला सकारात्मक पाहत आहोत. आम्ही मराठा समजला आरक्षण देणार आहोत, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. आरक्षण देणं हे राज्याच्या हातात आहे, केंद्र सकाराने सुद्धा सांगितलं आहे की राज्य आरक्षण देऊ शकतो. मनोज जरांगे यांना आरक्षण पटेल की नाही माहित नाही पण मराठा समजाला आरक्षण पटेल मान्य होईल. आरक्षण मिळावं यासाठी डेटा आम्ही गोळा करत आहोत, सर्वोच्च न्यायालयने आधी जो निर्णय दिला त्यानंतर आम्ही यावर काम करतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदी म्हणताय, लोकसभेला 400 पार जाणार हे गणित कसं मांडताय?
पंतप्रधान मोदीच नाही खर्गे सुद्धा म्हणताय 2024 ची निवडणूक ही पॉलिटिकल केमिस्ट्रीची निवडणूक आहे. यामध्ये 1+1 हे 11 होतात.ही केमिस्ट्री तयार झालीये.हे मोदीजींना माहिती आहे. लोकांना वाटतंय की आपला विचार करणारा पंतप्रधान आहे. त्यामुळे हा रिझल्ट येणार आहे. राज्यातून 48 पैकी 42 वर होतो त्यापेक्षा कमी जागा येऊ देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महायुतीचं राज्यातील जागावाटप -
ज्यांच्या स्टँडिंग जागा असतील त्या जागा तशाच त्या पक्षांकडे महायुतीमध्ये राहतील. त्यापेक्षा कमी जागा कशा देणार.फक्त एक दोन जागी उमेदवार इकडे तिकडे जातील, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र मोठा भाऊ -
गुजरात एक सक्षम राज्य आहे, मोठा भाऊ हा मोठा भाऊ राहणार महाराष्ट्र हा मोठा भाऊ आहे. लहान भावाचा विकास होत असेल तर वाईट वाटायचं कारण नाही मोठा भाऊ हा मोठाचं राहील आणि लहान भावाच्या पुढे जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा