ब्युरो टीम : शेतीसोबतच पशुपालन हेही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळं बहुतांश शेतकरी आता पशुपालनही करतात. यासाठी सरकार आर्थिक मदतही करते. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) यासाठी मोठी योजना राबवत आहे. जनावरे खरेदी करण्यासाठी आणि डेअरी युनिट सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जात होते. पण आता नवीन योजनेअंतर्गत ही रक्कम आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. नेमकी काय आहे ही योजना पाहुयात सविस्तर माहिती.
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत डेअरी युनिट उभारण्यासाठी मिळणारे अनुदान आता 25 टक्क्यांवरुन 50 टक्के करण्यात आले आहे. जेणेकरून अधिकाधिक लोक पशुसंवर्धनात सहभागी होतील. आता पशुपालनासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. ज्यामध्ये 50 टक्के सबसिडीही मिळणार आहे. पशुपालनाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. जेणेकरून डेअरी उद्योगाला गती मिळू शकेल. याशिवाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही स्वयंरोजगार मिळेल. छत्तीसगडचे कृषी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी बुधवारी कामधेनू विद्यापीठ, अंजोरा येथे झालेल्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात ही घोषणा केली.
काय आहे नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना?
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत, अर्जदाराच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम निश्चित केली जाते. जनावरांच्या खरेदीसाठी कर्जाची रक्कम 50 हजार ते 12 लाख रुपयांपर्यंत आहे. दुग्ध व्यवसायासाठी कर्जाची रक्कम 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तज्ज्ञांनी सांगितले की नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना दोन प्रकारात उपलब्ध आहे. पहिले पशु खरेदी कर्ज, ज्या अंतर्गत जनावरांच्या खरेदीसाठी पैसे दिले जातात. दुसरा दुग्धव्यवसायासाठी उपलब्ध आहे. ज्या अंतर्गत दुग्धव्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपकरणे खरेदीसाठी पैसे दिले जातात.
व्याजाची किंमत किती?
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेंतर्गत, कर्जाचा व्याज दर वार्षिक 6.5 टक्के ते 9 टक्के आहे. कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षांपर्यंत आहे. नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती/जमाती अर्जदारांना 33.33 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते. इतर अर्जदारांना 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते.
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेसाठी कागदपत्रे?
अर्ज
ओळख पुरावा
अर्जदाराचे पत्त्याचे प्रमाणपत्र
अर्जदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र
पशुपालन व्यवसाय नियोजन
अर्ज नाबार्डच्या वेबसाइटवरून किंवा कोणत्याही नाबार्ड प्रायोजित बँकेतून मिळू शकतो.
अर्ज संबंधित बँकेत जमा करावा.
योजनेचा उद्देश काय ?
नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, दुग्ध उद्योगाला चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजदरात पैसे मिळतात. कर्ज परतफेड कालावधी 10 वर्षे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी जमीन असावी.
कुठे अर्ज करायचा?
सर्वप्रथम तुम्हाला कोणता डेअरी फार्म उघडायचा आहे हे ठरवावे लागेल. नाबार्ड योजनेंतर्गत डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयात जावे लागेल. जर तुम्हाला छोटे डेअरी फार्म उघडायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन माहिती घेऊ शकता. सबसिडी फॉर्म भरून बँकेत अर्ज करावा लागेल. कर्जाची रक्कम मोठी असल्यास प्रकल्प अहवाल सादर करावा लागेल. यासंबंधी अधिक माहितीसाठी तुम्ही नाबार्ड हेल्पलाइन 022-26539895 /96/99 वर संपर्क साधू शकता.
टिप्पणी पोस्ट करा