ब्युरो टीम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळच्या भारी या परिसरामध्ये सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत झालेल्या सभांमधील सर्वात मोठा सभा मंडप यवतमाळमध्ये उभारण्यात आला आहे. या सभांसाठी नागपुरात राहुल गांधी यांच्या सभेसाठी वापरलेल्या खुर्च्या आल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांचा फोटो असून स्कँन टू डोनेट असे या स्टिकर्सवर लिहिले आहे. विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेऊन या सभेचं आयोजन केले आहे.
दोन लाख खुर्च्या, पण…
४७ एकर परिसरात सभामंडप तयार करण्यात आला आहे. सभास्थळी ९ लाख १० हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडप लावण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी सुमारे दोन लाख खुर्च्या टाकण्यात आल्याय आहेत. त्यातील काही खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टिकर्स आहेत. यामुळे या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. २०१४, २०१९ आणि आता २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वीही लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचा यवतमाळ दौरा झाला होता.
नागपुरात सभेत होत्या
नागपुरात राहुल गांधी यांच्या सभेला या खुर्च्या होत्या. त्या खुर्च्या यवतमाळमधील सभेतील कंत्राटदाराने आणले आहेत. या खुर्च्या आणताना राहुल गांधी याचे स्टिकर्स काढले नाही. मोदी यवतमाळमधून विदर्भातील १० लोकसभा मतदार संघाचे रणशिंग फुंकणार आहेत. परंतु खुर्च्याच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा प्रचार होत आहे. मोदी यांची दुपारी चार वाजता सभा होणार आहे. त्यापूर्वी हे स्टिकर्स काढले जाणार की नाही? हे आता काही वेळेत स्पष्ट होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी विविध कामाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. तसेच जण संघाचे अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारकाचे लोकार्पण सायंकाळी 4.30 होणार आहे. हे स्मारक यवतमाळ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नागपूर-तुळजापूर मार्गवर 300 मीटर अंतरावर दोन एकर परिसरात उभारण्यात आला आहे. 41 फूट उंचीचा हा पुतळा असून पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनप्रवास फोटो च्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा