ब्युरो टीम : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आपल्या साध्या सरळ स्वभावामुळे परिचित आहे. त्या स्वत: गृहिणी असल्याची जबाबदारी पार पाडत भाज्या घेण्यास जातात. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता मुंबईत आल्यानंतर त्यांनी मुंबई लोकलमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी लोकलमधून प्रवास करणाऱ्या लोकांशी चर्चा केली. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात अर्थमंत्री लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘इसलिए चाहिये, तीसरी बार मोदी सरकार, वो भी 400 पार’ देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकमधून प्रवास करत सर्वसामान्यांशी संवाद साधल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
व्हायरल झाला व्हिडिओ
निर्मला सीतारमण लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना व्हिडिओत दिसत आहे. त्यांना प्रवाशांनी घेरले आहे. प्रवाशी त्यांना प्रश्नही विचारत आहेत. त्याची उत्तरे त्या देत आहेत. लोकलमधील प्रवाशांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी सहप्रवाशांना दिले. मोदी सरकार करत असणाऱ्या कामांची माहिती त्या प्रवाशांना देत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकांनी सीतारमण यांचे कौतूक केले आहे. यामुळे नेता आणि सर्वसामान्य लोक यांच्यामधील आंतर कमी झाले. काही लोकांनी निर्मला सीतारमन या जमिनीवर असलेल्या नेत्या असल्याचे म्हटले आहे. त्यांना लोकांच्या समस्यांची जाणीव आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला व्हिडिओ
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्मला सीतारमन यांचा व्हिडिओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशात आात तिसऱ्यांदा मोदी सरकार होणार आहे. निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळणार आहे. देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मुंबई लोकलमधून प्रवास केला. त्यांना सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या सरकारमध्ये प्रत्येक नेता जनसेवक असतो. देशातील अंतिम व्यक्तीच्या जीवनात बदल आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
टिप्पणी पोस्ट करा