OTT Platform : ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत पुढील बैठक संसदेच्या अधिवेशनात होणार - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर

 

ब्युरो टीम : सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजनासाठी सर्वात मोठं माध्यम ठरत आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक इंटिमेट सीन आणि अश्लीलता मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येते. यावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सडेतोड वक्तव्य करत ओटीटी प्लॅटफॉर्मना स्पष्ट इशारा दिला आहे. पत्रकार आनंद विजय यांच्या ‘ओव्हर द टॉप’ पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात अनुराग ठाकूर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मौन सोडलं आहे. ”ओव्हर द टॉप’ हे पुस्तक ओटीटी प्लॅटफॉर्मवर लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.’

‘अनंत विजय यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर उत्तम पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकात सध्या सुरु असलेल्या आणि नकारात्मक गोष्टींवर अधिक भर देण्यात आलं आहे. पुस्तकात मांडण्यात आलेल्या विषयांना माझं समर्थन आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची सकारात्मक बाजू देखील आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. संधी देखील वाढत आहेत.’

‘ओटीटीसोबत आम्ही सतत संपर्कात आहोत. ओटीटी हा प्रेक्षकांवर आधारित आहे आणि प्रेक्षकांची संख्या वाढत आहे, संधीही वाढत आहेत. सेल्फ रेगुलेशन असायला हवं. पण काही नियम असायला हवेत. जबाबदारीची जाणीवही असली पाहिजे. आमचं लक्ष्य व्यवसायाला मागे टाकणं नाही तर, वाढवणं आहे. ओटीटी सेल्फ रेगुलेशनच्या नावाखाली नग्नता, असभ्यता, असभ्य भाषा, अश्लीलता यांसारख्या गोष्टींना दुजोरा देत असेल तर, पूर्वी देखील कारवाई झाली होती, पुढे देखील होईल. धार्मिक भावना दुखावल्यामुळे कधीकधी अनेक समस्या निर्माण होतात.

पुढे अनुराग ठाकूर म्हणाले, ‘ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत पुढील बैठक संसदेच्या अधिवेशनात होणार आहे. अन्य विषय देखील आम्ही मांडणार आहोत. ओटीटी आणि युट्यूबमागे दुसरे कोणते खेळ खेळले जाणार असतील तर, खपवून घेतलं जाणार नाही. देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर आघात झाल्यास कारवाई केली जाईल. फेक न्यूज एक आव्हान बनले आहे. ओटीटीने खरी माहिती देखील दिली पाहिजे.’

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने