Police : रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज रंगली ओळख परेड; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती

 

ब्युरो टीम : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खूनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. शरद मोहोळ याची महिन्याआधी भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र त्याआधी नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आलीये. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते.

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास दोनशे ते तीनशे गन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली. पुणे शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे त्यांना सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलंय.

पुणे शहरातील कायम चर्चेत असलेले गजानन मारणे, बाबा बोडके, जंगल्या सातपुते आणि निलेश घायवळ हे मोठे गुन्हेगार उपस्थित होते. यामधील काही गुन्हेगार हे जामिनावर बाहेर आहेत तर काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे अशा सर्वांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा वापर करू नये, अशा सूचना पोलिसांनी या गुंडांना दिल्या गेल्या आहेत.






0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने