बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे शुक्रवारी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे निधन झाले, आज २ फेब्रुवारी रोजी वयाच्या 32 व्या वर्षी गर्भाशयाच्या कर्करोगाने तिचे निधन झाले. असे तिच्या व्यवस्थापकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात लिहले आहे "आजची सकाळ आमच्यासाठी खडतर आहे. तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आम्ही आमची लाडकी पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने गमावले आहे. तिच्या संपर्कात आलेले प्रत्येक व्यक्ती तीला निखळ प्रेम आणि दयाळूपणे भेटले. या दुःखाच्या काळात, आपण तिच्या खाजगी आयुष्याचा मान राखाल अशी आशा करतो, जेव्हा आम्ही सामायिक केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही तिची प्रेमाने आठवण ठेवतो."
तिच्या अश्या अचानक जाण्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे, पूनम पांडेने २०१३ मध्ये आलेल्या ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती शेवटची रिॲलिटी शो 'लॉक अप' मध्ये दिसली होती. एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेली पांडे केवळ एक अभिनेती म्हणूनच नव्हे, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील प्रसिद्ध अशी व्यक्ती होती.
टिप्पणी पोस्ट करा