ब्युरो टीम :पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली आहे. ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. पुण्यात पब नाईटलाईफदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुण्यातील तरुणांचा हाच रात्रीचा धिंगणा थांबवण्यासाठी आयुक्तांनी पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देण्यात आली आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.
पोलिसांनी केलेल्या सूचना कोणत्या?
- हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा डीजे येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे आहे.
- स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे.
- हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे.
- सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावेत.
- हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी करावी.
- कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक आहे.
- हॉटेलमध्ये धुम्रपानासाठी (स्मोकिंग झो) स्वतंत्र जागा असावी.
पुणे पोलिसांनी करडी नजर
पुण्यात राज्यातून मोठ्या प्रमाणात तरुणाई आली आहे. त्यात पुण्यात मोठ्या आयटी कंपन्यादेखील आहे. राज्यातील विविध भागातून आलेले तरुण-तरुणींमुळे आणि पुणेकरांमुळे पुण्यातील नाईटलाईफमध्ये मोठा बदल झाला आहे. मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत भर पडण्याची अनेक कारणं आहेत. मात्र पुण्यातील नाईटलाईफमध्ये झालेला बदल आणि पब, हॉटेल्समुळे अनेक लोक रात्रीचे बाहेर पडतात. त्यात हुक्का आणि मद्यप्राशन करतात. त्यामुळे रात्री हा धिंगाणा अनेकदा रस्त्यावर दिसतो. हाच धिंगाणा रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्वाची पावलं उचलली आहे. त्यांनी प्राथमिकरित्या काही नियमावली घालून दिली आहे. 15 दिवसांसाठी ही नियमावली आहे. त्यावर 15 दिवस नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेतल्या जाणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत हुक्का पार्लरवरदेखील पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. येत्या काही दिवसांत कायमची नियमावली जाहीर होणार आहे. पुण्यातील सगळ्यात वाईट आणि अवैध धंदे, पब, नाईटलाईफवर पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा