ब्युरो टीम : रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवशी राजकोटमध्ये टीम इंडियाच अडचणीत असताना झुंजार शतक ठोकलं आहे. रोहितने खऱ्या अर्थाने कॅप्टन्सी इनिंग खेळली आहे. टॉस जिंकून बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाने झटपट 3 विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर रोहितला चांगली साथ देत रवींद्र जडेजा याने चांगली साथ दिली. दोघांनी एकेरी-दुहेरी धाव घेत स्कोअरकार्ड हलता ठेवला. तसेच संधी मिळाली तेव्हा मोठे फटके मारले. अशाप्रकारे दोघांनी शतकी भागीदारीही केली. त्यानंतर टी ब्रेकनंततर रोहितने शतक झळकावलं.
रोहितने 157 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 64.33 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील हे 11 वं शतक ठरलं. तसेच इंग्लंड विरुद्धचं आणि कॅप्टन म्हणून हे तिसरं शतक होतं. रोहितने या शतकासह इंग्लंडच्या जो रुट याला मागे टाकलं आहे. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा तिसरा सक्रीय फलंदाज ठरला आहे. रोहितच्या नावावर तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून आता एकूण 47 शतकांची नोंद झाली आहे. तर जो रुट याच्या नावावर 46 शतकं आहेत. तर विराट कोहली 80 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
रोहितकडून दिग्गजांची बरोबरी
रोहितचं कसोटी कारकीर्दीतील ओपनर म्हणून हे तिसरं शतक ठरलं. रोहितने यासह मुरली विजय, केएल राहुल आणि दिग्गज विजय मर्चेंट यांच्या विक्रमाची बरोबरी केली. सुनील गावसकर यांच्या नावावर टीम इंडियाकडून कसोटी ओपनर म्हणून सर्वाधिक 4 शतकांचा विक्रम आहे.
रोहित शर्मा याची झुंजार शतकी खेळी
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
टिप्पणी पोस्ट करा