Sharad Sonavane : सध्या शिवसेना जिल्हाध्यक्ष असलेले माजी आमदार परत स्वगृही परतणार;२०१४ मध्ये 'या' पक्षाचे होते एकमेव आमदार

 

ब्युरो टीम; सध्या विरोधी पक्षातील नेत्यांचा सत्ताधारी पक्षाकडे कल वाढू लागला आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते सध्या शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. कालच काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याआधी बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. या दोघांच्याआधी मिलिंद देवरा यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हे तिन्ही नेते विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे सदस्य होते. विरोधी पक्षातून सत्ताधारी गटात येण्यासाठी चढाओढ सुरु असताना एक सत्ताधारी पक्षातला नेता विरोधी पक्षात जाऊ शकतो. महत्त्वाच म्हणजे विधिमंडळ, पालिका स्तरावर फार मोठी ताकद नसलेल्या पक्षात हा नेता प्रवेश करु शकतो. हा बडा नेता पुणे जिल्ह्यातून येतो.

जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा आपल्या स्वगृही परतण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यानंतर शरद सोनवणे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. शरद सोनवणे यांच्याकडे सध्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पण तेच शरद सोनावणे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करु शकतात. सध्या राज्यात राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार आहे. त्यांच्याआधी शरद सोनावणे यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार होता.

राज ठाकरेंसोबत हा नेता कुठे दिसला?

शिवसेनेत असणारे शरद सोनावणे 2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी मनसेत प्रवेश करुन आमदार झाले होते. त्यावेळी ते मनसेचे एकमेव आमदार होते. त्या नंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. आता शरद सोनावणे स्वगृही म्हणजे मनसेमध्ये परतण्याची शक्यता आहे. ओझर येथील कार्यक्रमात शरद सोनवणे हे राज ठाकरेंसोबत पाहायला मिळाले. त्यामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने