Amit Shaha : लोकसभेसाठी एकनाथ शिंदेनी अमित शहांकडे केली 'या' जागांची मागणी

ब्युरो टीम : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मंगळवारपासून महाराष्ट्र दौरा सुरु झालाय. अमित शाह यांनी महाराष्ट्रात संभाजी नगर येथील सभेद्वारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या सभेनंतर अमित शाह यांनी मंगळवारी रात्री उशिरा महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली? काय घडामोडी घडल्या? त्याची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवरुन मतभेद आहेत. उदहारणार्थ सिंधुदुर्ग, शिरुर अशा काही मतदारसंघांचा तिढा अजून सुटलेला नाहीय. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हाच तिढा सोडवण्याचा प्रयत्न झाला.

रात्री उशिरा अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. तब्बल 40 मिनिटं ही बैठक सुरू होती. आपल्या पक्षाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात यासाठीही एकनाथ शिंदे आग्रही होते. राज्यात आपण उठाव केलाय आणि सर्व आमदार खासदार सोबत घेऊन पक्ष वाढवत असल्याचंही शिंदे म्हणालेत. निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या सर्व 13 विद्यमान खासदारांना तिकीट द्या, अशी आग्रही मागणी एकनाथ शिदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे.

अमित शाह यांनी शिंदेंना काय समजावण्याचा प्रयत्न केला?

अमित शाह यांनी त्यांना विविध मतदारसंघात ग्राउंड रिॲलिटी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे काही उमेदवार जिंकणार नाहीत, तिथे भाजपा जिंकू शकते, असा अमित शाह यांचा सूर होता. शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार? हे चित्र अजून स्पष्ट नाहीय. शिवसेनेच्या काही खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याच बोललं जातंय. तिकीट मिळेल की नाही? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. काही खासदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याचाही विचार करत आहेत. मित्र पक्षाला जागा दिल्या, तर आपलं काय होणार? असा प्रश्न भाजप उमेदवारांना पडलाय. शिंदेंसोबत आलेले नेते यांनी पुन्हा उद्धव ठाकरे गटाची वाट धरल्यास तो त्यांच्यासाठी मोठा राजकीय फटका ठरेल. सत्तेत तिघेही एकत्र असले, तरी सध्याच्या परिस्थितीत जागा वाटपाचा तिढा सोडवण हे महायुतीमधील मुख्य आव्हान आहे.

महायुतीचा खालील जागेवर तिढा

उत्तर पश्चिम मुंबई

रत्नागिरि- सिंधुदूर्ग

रायगड

शिरुर

मावळ

नाशिक

रामटेक

पालघर

ठाणे

संभाजीनगर

धाराशिव

परभणी

यवतमाळ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने