BJP : भाजपचा ३७० जागा जिंकण्याचा संकल्प; आता 'आय'राज्यातील जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेणार

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याची पक्षांची तयारी सुरु झाली आहे. भाजपने ३७० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. तर एनडीएला अब की बार ४०० पार चा नारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे. एनडीएला ४०० जागा मिळाव्या म्हणून भाजपने रणनीती आखली आहे. भाजपने अनेक जुन्या मित्रपक्षांना पुन्हा एकदा एकत्र आणले आहे. भाजपने आता आणखी एका नव्या पक्षाला आपल्यासोबत घेण्याची तयारी केली आहे. कोणता आहे तो पक्ष आणि भाजपला त्याचा किती फायदा होईल जाणून घेऊयात.

भाजच्या नेतृत्वातील एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळाव्या म्हणून भाजप मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा करण्यात व्यस्त आहे. भाजपने आता ओडिशामध्ये ही चाचपणी सुरु केली आहे. ओडिशामध्ये भाजपने सत्तेत असलेले मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाशी (भाजप) युती करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची सूत्रांची माहिती आहे.

भाजप-बीजेडीमध्ये युती?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ओडिशामध्ये भाजप आणि बीजेडी यांच्यात युतीची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी ओडिशा दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक एकाच मंचावर दिसले. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एकमेकांचे कौतुक केले. यानंतर ओडिशात राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर राज्यात भाजप आणि बीजेडी यांच्यातील संभाव्य युतीबाबत चर्चा जोरात सुरु झाली आहे.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांना लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कौतुक केले. उत्तरादाखल मुख्यमंत्री पटनायक यांनीही भारताच्या आर्थिक विकासात पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे कौतुक केले. नवीन पटनायक यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या बदलांमुळे देश पुढे गेला आहे. पंतप्रधानांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते बिजू पटनायक यांचेही स्मरण केले आणि त्यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार?

पंतप्रधान मोदींनी ओडिशा सरकारवर थेट टीका करण्याचे टाळले. पंतप्रधानांनी भाषणात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला केला. निवडणूक आयोग मार्चच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. ओडिशामध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपला या दोन्ही निवडणुकांमध्ये ओडिशातील सत्ताधारी बीजेडीसोबत युती करून नशीब आजमावायचे आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने