ब्युरो टीम : अखेर तो ११ मार्च १६८९ चा काळा दिवस उगवला. छञपती संभाजीराजे यांचा सलग चाळीस दिवस छळ चालु होता. डोळे,जीभ, हात, पाय तोडले तरी संभाजी राजेंनी शरणागती न पत्करता हा छावा स्वाभिमानाने ताठ उभाच होता. शेवटी गर्दन शरीरापासून वेगळी करण्यात आली. औरंगजेबाला नऊ वर्ष या छाव्याने डोंगर दऱ्यात पळवले.संभाजीराजे देव, देश, धर्म व स्वराज्यासाठी इथल्या रयतेसाठी शेवटपर्यंत जगले व शेवटी स्वराज्यासाठी त्यांनी प्राण अर्पण केला. जगावं कसे ते शिवाजी महाराजांनी शिकवले तर मरावं कस हे संभाजी राजेनी समाजाला दाखवुन दिले. औरंगजेब वैतागला पण संभाजी राजे शरण आले नाहीत. स्वराज्य त्यांनी पराक्रमाने वाढवले संभाजी महाराजानीं अनेकांना न्याय दिला. अन्याय विरोधात त्यांनी कायमच लढा दिला. शत्रुला संभाजी नावाची हि भिती बसली होती. शंभुराजे झुकले, वाकले नाहीत. कुठेही त्यांनी स्वार्थासाठी शत्रूशी तडजोड केली नाही. आजकाल सर्व ठिकानी तत्वे, विचारांना तिलांजली देवुन स्वार्थासाठी तडजोड केली जाते. खरतर स्वभिमान कसा जपावा हे आम्हाला शंभुराजेच्या इतिहासातून समजते.त्यांच्या दरबारी अनेक जाती धर्माचे मावळे होतें.राजेनी कधीही जात-धर्म भेद पाळला नाही.आज समाजात सर्वत्र भेदाभेद दिसुन येतो. खरतर संभाजी राजेचे बलीदान आम्हाला कायमच जगण्यास प्रेरणा देत राहील.युवकानी शंभुराजेचे चरित्र डोळ्यासमोर ठेवल्यास युवकांच्या आत्महत्या थांबतील. एकीकडे सुपारीचेही व्यसन नसणारे शंभूराजे व आजकालचे व्यसनात बुडालेले तरुण पाहता मन व्यथित होते.खरंतर संभाजी हे नाव नसून प्रेरणादायी विचार आहे.संभाजीराजे कायमचं आमच्या हृदयात दैवतं बनून जिवंत राहतील.अशा या दैवतास विनम्र अभिवादन.
लेखक - प्रा. महेंद्र मिसाळ
(प्रसिद्ध व्याख्याते व लेखक)
टिप्पणी पोस्ट करा