Chhagan Bhujbal : नाशिकमधून छगन भुजबळ महायुतीचे उमेदवार?; भुजबळांसह पदाधिकाऱ्यांचा ताफा पुण्याला रवाना झाला आहे.

 

ब्युरो टीम : नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजपने या जागेवर दावा केलेला असतानाच अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. अखेर छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. छगन भुजबळ नाशिकमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. दिल्लीतून भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याचं माहिती खात्रिलायक सुत्रांनी दिली आहे. आता नाशिकच्या जागेवरचा तिढा सुटला असल्याचं म्हणता येईल. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी छगन भुजबळ रवाना झाले आहेत.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी

लोकसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी आज पुण्यात महत्वाची बैठक बोलावली आहे. माढा, नाशिक आणि सातारा मतदारसंघाची आढावा बैठक आज अजित पवारांनी बोलावली आहे. या बैठकीला छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळांसह नाशिक लोकसभेतील अजित पवार गटाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. अजित पवारांनी बोलावलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठकीला नाशिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भुजबळ फार्मवरून भुजबळांसह पदाधिकाऱ्यांचा ताफा पुण्याला रवाना झाला आहे.

भुजबळ काय म्हणाले?

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला छगन भुजबळ रवाना झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्याला राष्ट्रवादीची बैठक आहे. ज्या जागा आम्हाला मिळणार आहे किंवा शक्यता आहे. जिंकण्याची कितपत तयारी आहे. जिथं जिथं जागा मिळण्याची शक्यता आहे त्याबाबत बैठक अजित पवारांनी बोलावली आहे. पक्षाचा नेता म्हणून अजित दादा आढावा घेणार आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

उमेदवारीवर काय म्हणाले…

दिल्लीतून उमेदवारी निश्चित झाली आहे. यावर तुमचं मत काय? असं विचारण्यात आलं तेव्हा मला कल्पना नाही, मी पुण्याला गेल्यावर विचारतो. जे दिल्लीला गेले होते त्यांना जाऊन विचारतो. अनेकजण इच्छुक आहेत. आम्ही कुणावरही दबाव टाकला नाही. मी राष्ट्रवादी पक्षात, माझ्या पक्षातर्फे लढणार, पक्ष बदलण्याचा प्रश्न येत नाही. ज्या पक्षाला जागा सुटेल तो लढेल. ज्या गटाचा उमेदवार असेल त्याला 100 टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार, असं भुजबळ म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने